Tag: Poems

बदलला माणूस , बदलली माणुसकी!

युगे बदलली काळ लोटला,
प्रत्येक कामासाठी मोबदला लागू लागला.
न राहिला जिव्हाळा, न राहिली
आपुलकी,
बदलला माणूस, बदलली माणुसकी!

जिभेचे हे चोचले पुरवण्यासाठी,
आठवड्यातून एकदा तरी हवे मांसाहारी जेवण.
आणि मग कापला बोकड केलं मटण,
कापली कोंबडी केलं चिकन.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस बदलली माणुसकी!

आला कुठून हा काळ्या जादूचा बाजार
झाली कारणी होऊन बसला आजार.
कोणी म्हणे भुताने पछाडले,
कोणी म्हणे पूर्व कर्माचे फळ मिळाले.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस , बदलली माणुसकी!

लढली पिढी, लढले दिग्गज
मिळविला स्त्रियांचा हक्क व अधिकार
तरीही होतो स्त्रियांवर अत्याचार,
ज्या पुढे समाज होतो अजूनही लाचार.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस बदलली माणुसकी!

Advertisements