Tag: Marathi

बदलला माणूस , बदलली माणुसकी!

युगे बदलली काळ लोटला,
प्रत्येक कामासाठी मोबदला लागू लागला.
न राहिला जिव्हाळा, न राहिली
आपुलकी,
बदलला माणूस, बदलली माणुसकी!

जिभेचे हे चोचले पुरवण्यासाठी,
आठवड्यातून एकदा तरी हवे मांसाहारी जेवण.
आणि मग कापला बोकड केलं मटण,
कापली कोंबडी केलं चिकन.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस बदलली माणुसकी!

आला कुठून हा काळ्या जादूचा बाजार
झाली कारणी होऊन बसला आजार.
कोणी म्हणे भुताने पछाडले,
कोणी म्हणे पूर्व कर्माचे फळ मिळाले.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस , बदलली माणुसकी!

लढली पिढी, लढले दिग्गज
मिळविला स्त्रियांचा हक्क व अधिकार
तरीही होतो स्त्रियांवर अत्याचार,
ज्या पुढे समाज होतो अजूनही लाचार.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस बदलली माणुसकी!

Advertisements

आज मातृ दिवस

आज मातृ दिवस???
तो कसा काय ?
तो तर मे महिन्यात असतो न ..
मग?? आज कसा काय?
आश्चर्य झालं न..

श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा. आणि आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस. म्हणजे पोळा.
पीटोरी अमावस्या नंतर, जो दिवस येतो तो मातृ दिनाचा निमित्याने ओळखला जातो. पूर्वी या दिनी पीटोरीच वाण म्हणून आई तिच्या मुलाला शिरा आणि पुरी देत, जे तिच्या ममतेचा प्रतिक असे.
अशा प्रकारे हा मातृ दिन साजरा होत होता.

पण आता अशी पद्धत राहिली नाही. आधुनिकीकरणा मुळे, पाशिमात्य उत्सव भारतावर बराच प्रभाव पडून गेले. म्हणून आज आपल्याला अशा गोष्टी कळल्या की आश्चर्य होतं.
मलाही झालं. मला ही गोष्ट आज कळली.
वाटलं: मला हे आधी का माहिती नव्हतं, असचं मराठी सणाचं महत्व कमी होत जाणार का..

माझ्या सारक्या अनेक लोकांना ही गोष्ट माहिती व्हावी म्हणून हे लिहीलं..

आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपेल..
नाही का… 😉