बदलला माणूस , बदलली माणुसकी!

युगे बदलली काळ लोटला,
प्रत्येक कामासाठी मोबदला लागू लागला.
न राहिला जिव्हाळा, न राहिली
आपुलकी,
बदलला माणूस, बदलली माणुसकी!

जिभेचे हे चोचले पुरवण्यासाठी,
आठवड्यातून एकदा तरी हवे मांसाहारी जेवण.
आणि मग कापला बोकड केलं मटण,
कापली कोंबडी केलं चिकन.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस बदलली माणुसकी!

आला कुठून हा काळ्या जादूचा बाजार
झाली कारणी होऊन बसला आजार.
कोणी म्हणे भुताने पछाडले,
कोणी म्हणे पूर्व कर्माचे फळ मिळाले.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस , बदलली माणुसकी!

लढली पिढी, लढले दिग्गज
मिळविला स्त्रियांचा हक्क व अधिकार
तरीही होतो स्त्रियांवर अत्याचार,
ज्या पुढे समाज होतो अजूनही लाचार.
पण ज्याने केलं तोच विसरला आपुलकी,
बदलला माणूस बदलली माणुसकी!

Advertisements

9 thoughts on “बदलला माणूस , बदलली माणुसकी!

  1. तुझ्या कल्पना खूप चांगल्या आहेत
    त्या आणखी वाढव आणि प्रगती कर

  2. फार सुंदर लिहीले आहे अजुन मनातले काही लिहत जा की ज्यामुळे माणसात माणुसकी येईल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s