The IPL Rules..

IPL is going on in a great drift since 2 weeks. All the matches seems much interesting than the previous ones due to the super-overs and other things.  Between, the news are flashing that two new teams are going to get introduced for the IPL-IV. The team from Pune and Kochi.

Sounds intresting.. 🙂

I just now received a mail that states some of the rules that Pune team would specify in their style.. Just read them, its really funny!

१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.

२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.

३. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !

४. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.

५. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.

६. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.

७. सामन्यातील कसल्याही घटनेचा म्हणजे सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे चा राग खुर्च्यांवर काढु नये.

So, hows that? 😀

Advertisements

3 thoughts on “The IPL Rules..

 1. The IPL Notice Board in Pune…

  1.”फलंदाजा कडून धावा निघत नसतील तर मैदानावर उगीच टवाळक्या करत बसू नये”

  2.गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा अन्यथा प्रत्येक नविन चेंडूचे ३ रुपये आकारण्यात येतील …….

  ३.क्षेत्रारक्षकांनी दुपारी १ ते ४ या वेळेत उगीचच Howzzat म्हणून गोंधळ करू नये ,लोक इकडे झोपलेली असतात

  ५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.

  ६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.

  फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.

  Pune tithe kaay uune. 😀

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s